भाषा निवडा

वेळ
पसंद
592
पहिले
2575
टिप्पण्या
0 People

   

समुद्रकिनारा

काशीद बीच

माहिती

अलिबाग मुरुड हमरस्त्यावर अवघ्या जगामध्ये प्रसिद्ध होऊन राहिलेला काशीद बीच सुट्ट्यांच्या काळामध्ये गजबजलेला आपणास पाहता येईल. येथील शुभ्र समुद्रकिनारा जणू गोव्यातील समुद्र यांची आठवण करून देतो. किनारा अतिशय स्वच्छ व विविध प्रकारची दुकाने, घोडा गाड्या, वॉटर स्पोर्ट चे साधने उपलब्ध आहेत. येथील किनाऱ्यावरील रस्त्याच्या पलीकडे सुरुची वन अतिशय विलोभनीय असे आहे. येथेच पर्यटकांची गर्दी त्यांची वाहने मोठ्या संख्येने आपणास सुट्टीच्या काळात निश्चितपणे दिसतील.

या गावचे विशेष म्हणजे येथे पर्यटनास उपयुक्त सर्व उद्योग काशीद गावातच तरुण करताना आपणास दिसते. या निसर्गरम्य ठिकाणी मॉडलिंग, फोटोग्राफी, टीव्ही सिरीयल आणि पिक्चर चे शूटिंग होत असते. मुंबई येथील समुद्र मार्ग हा समुद्र किनारा जवळ असल्याने मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक येथे येत असतात का शिरगावचे पर्यटकांना कमी दरात राहण्याची व जेवण्याची व्यवस्था आहे. येथे दोन ते तीन दिवस पर्यटक राहण्यास येतात.

आढावा

रेटिंग
एकूण पहिले 2575
एकूण पसंती 592
एकूण टिप्पणी 0

अधिक माहिती..

सर्वच पर्यटकांचे मनपसंत ठिकाण आहे. रस्त्याला लागून असलेले सुरुबनाची दाट सावली, रूपेरी वाळूचा स्वच्छ किनारा आणि किनाऱ्याकडे अव्याहत झेपणाऱ्या लाटा खास आकर्षक आहेत. बारामाही शनिवार - रविवार आणि हंगामामध्ये तर अक्षरशः या किनाऱ्यास चौपाटीचे स्वरूप लागत असते. किनाऱ्यावर वडापाव पासून सर्वच गरजा पुरवणारी स्टॉल आहे. सुट्टीच्या मूडमध्ये बेभानपणे समुद्रस्नान करणाऱ्यांसाठी सावधगिरी आवश्यक. पाण्याच्या लाटांचा अंदाज न येणे, अधिक खोलवर गेल्यास वाळीत पाय रुतणे या काही कारणामुळे दुर्घटना घडू शकते. निसर्गाचे रसपान करताना त्याची मर्यादा ओलांडू नये. खडकाळ भागापासून दूर एकमेकांचा हात धरून उभे राहणे केव्हाही चांगले.

फोटो गॅलरी..



व्हिडिओ गॅलरी..

आपत्कालीन सेवा


पालिका कार्यालय
  •      02144274026
  •    Lokmanya Tilak Rd, Bhandarwada, Murud, Maharashtra 402401
पोलीस चौकी
  •       02144274033
  •    Murud Janjira, Murud - 402401
रुग्णवाहिका
अग्निशमन केंद्र
तहसील कार्यालय
गॅरेज
  •      
  •   
गाईड / ट्रॅव्हल एजन्ट
  •      

वापरकर्ता टिप्पण्या (0)

तुमची प्रतिक्रिया द्या