अलिबाग वरुन मुरुडकडे येताना सिद्दी, नवाबाचा राजवाडा सोडल्यानंतर शहरात प्रवेश करताच उजव्या बाजूला 2.5 ते 3.0 कि.मी लांब व विस्तीर्ण समुद्रकिनारा ब दाट नारळ - सुपाऱ्यांच्या बागा दिसून येतात.
अलिबाग मुरुड हमरस्त्यावर अवघ्या जगामध्ये प्रसिद्ध होऊन राहिलेला काशीद बीच सुट्ट्यांच्या काळामध्ये गजबजलेला आपणास पाहता येईल. येथील शुभ्र समुद्रकिनारा जणू गोव्यातील समुद्र यांची आठवण करून देतो.